Share Market Tips in Marathi

Share Market Tips in Marathi | शेअर मार्केट मध्ये यशस्वी होण्यासाठी हे टिप्स वापरा!

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

आज आपण शेअर मार्केट मध्ये यशस्वी होण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो केल्या पाहिजे! (Share Market Tips in Marathi) त्याबद्दल माहिती जाणून घेऊया. ह्या Share Market Marathi Tips वापरून तुम्ही गुंतवणूक करून तुम्ही शेअर मार्केट मध्ये यशस्वी होऊ शकता. शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवून पटकन लखपती बनण्याचे स्वप्न अनेकजण बघत असतात.

भारतात दिवसेंदिवस शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. काही जण कुणाच्या सांगण्यावरून किंवा यूट्यूब वर बघून शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करतात. पण असे करून ते अनेक वेळा आपले पैसे गमावून बसतात.

त्यामुळे शेअर बाजारात पैसे गुंतवण्याअगोदर तुम्हाला ह्या Share Market Tips in Marathi काळजीपूर्वक वाचून जाणून घेतल्या पाहिजेत. त्यानंतर तुम्ही व्यवस्थित शेअर बाजारात गुंतवणूक केली पाहिजे. शेअर मार्केट मध्ये अनेकजण पैसे लावतात आणि लखपती बनतात. पण सगळ्यांच्या सोबत असेच होईल, असे नाही आहे.

भारतातील तरुण पिढी पटकन पैसे कमावण्याच्या हेतूने शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत. पण शेअर बाजाराचे संपूर्ण ज्ञान नसल्याने ते पैसे पूर्णपणे गमावतात. व निराश होऊन जातात. शेअर मार्केटमधून पैसा कमावणे सोप्पे नाही आहे. त्यासाठी आपल्याला Share Market चे संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे.

जर तुम्हाला मराठी मधून शेअर मार्केट कोर्सेस शिकायचे असतील, तर आपल्या वेबसाईट वरील हा लेख नक्की वाचा. Share Market चे कोर्स शिकल्यानंतर आपल्याला समजते की, कोणत्या वेळी कोणता शेअर खरेदी घ्यावा. तसेच कधी शेअर विकायचा व आपल्याजवळ ठेवायचा.

ह्याबद्दल संपूर्ण माहिती मिळते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे संपूर्ण ज्ञान असेल की, आपण खूप यशस्वी होऊ शकतो. चला तर मग आजच्या लेखाला सुरुवात करुया.

शेअर मार्केट मध्ये यशस्वी होण्यासाठी हे टिप्स वापरा! (Share Market Tips in Marathi)

1. शेअर मार्केट संबंधी संपूर्ण कोर्स शिकून घ्यावा.

Share Market Marathi tips
Share Market Marathi tips

तुम्हाला जर एकही पैसे न खर्च करता शेअर मार्केट कोर्स शिकायचा असेल. तर इंटरनेट वर अनेक कोर्स उपलब्ध आहेत. तसेच यूट्यूब वर सुद्धा अनेक शेअर मार्केट चॅनल्स आहेत. ह्या यूट्यूब चॅनल्स वर दिलेले कोर्स सुद्धा तुम्ही शिकू शकता.

Share Market कोर्स पूर्ण केल्याने तुम्ही Beginner नाही, तर Professional बनता. व तुमच्याकडे शेअर बाजारातील सर्व गोष्टींचे ज्ञान असते. त्यामुळे कोणताही अडथळा तुमच्या समोर येणार नाही व तुम्ही योग्य तो स्टॉक खरेदी करू शकता.

2. तुमच्याकडील अतिरिक्त पैसे गुंतवा!

invest extra money in stock market Marathi tips
invest extra money in stock market Marathi tips

शेअर बाजारात गुंतवणूक करण्याअगोदर एका वहीवर तुमच्याजवळ असलेली जमा रक्कम किती आहे ते लिहा. त्यानंतर अतिरेक पैसे किती आहेत ते नोंदवून ठेवा. त्यानंतर तुम्ही शेअर बाजारात किती पैश्यांची गुंतवणुक करणार आहे, ते सुद्धा लिहून ठेवा.

तर त्यामधील तुम्ही तसेच तुमच्याकडील अतिरेक (extraa) पैसे शेअर बाजारात गुंतवा. कारण, काही पैसे हे आपण पुढील भविष्यासाठी राखून ठेवलेले असतात. त्यामुळे सर्व एकत्र गुंतवणे योग्य ठरणार नाही.

तसेच अतिरेक पैसे गुंतवल्यामुळे लॉस झाला, तरी तुम्हाला जास्त काही गमवाव लागणार नाही. जसे की, तुमच्याकडे जमा रक्कम आहे, 80,000. तर त्यातील फक्त 8,000 ते 10,000 पैसे तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी बाजूला काढा. व त्यातील उरलेली रक्कम तुमच्या घरच्या वापरासाठी साईड ला ठेवा. ज्यामुळे वेळेप्रसंगी ते पैसे तुम्हाला उपयोगी येतील.

3. दुसऱ्यांचे ऐकुन शेअर बाजारात गुंतवणूक करू नका.

शेअर मार्केट टिप्स मराठी
शेअर मार्केट टिप्स मराठी

आपल्याला नेहमी सवय असते की, आपण छोट्यात छोट्या गोष्टी आपल्या आईला, मित्रांना किंवा भावाला विचारून करतो. ज्यामुळे कधी कधी आपला फायदा होतो, तर कधी कधी नुकसान होते. आजकाल सोशल मीडिया आणि टीव्ही वर अनेक शेअर मार्केट संबंधी माहिती दिली जाते.

तसेच शेअर मार्केट संबंधी टिप्स दिल्या जातात. त्या टिप्स व ते व्हिडिओज बघून कित्येकजण शेअर बाजारात गुंतवणूक करतात. व कधी कधी तोट्यात जातात. त्यामुळे इतरांचे ऐकून कधीही गुंतवणूक करू नये.

टीव्ही वरील अनेक न्यूज चॅनल वर शेअर मार्केट तज्ञ शेअर मार्केट विषयी माहिती व गुंतवणूक कशी करायची ह्याच्या टिप्स व मार्ग सांगतात. पण आपण ह्यांनी दिलेले stocks खरेदी नाही केले पाहिजे. कारण हे stocks तुम्हाला कधी कधी Profit मिळवून देतील, तर कधी कधी Loss. त्यामुळे Stocks खरेदी करताना त्या कंपनीचा व्यवस्थित अभ्यास करून खरेदी केला पाहिजे.

तसेच टीव्ही किंवा सोशल मीडिया वरील तज्ञांचा फक्त सल्ला ऐकावा. त्यानंतर व्यवस्थित अभ्यास करून गुंतवणूक करावी.

4. योग्य वेळी योग्य तो शेअर खरेदी करावा.

Stock Buy and sell tips in Marathi
Stock Buy and sell tips in Marathi

शेअर मार्केट मध्ये पटकन पैसे कमावण्याच्या नादात आपण पटकन कोणताही शेअर खरेदी करतो. आणि नंतर मग तो शेअर खाली पडला की निराश होऊन जातो. त्यामुळे कोणत्याही कंपनीचा शेअर स्वस्त मिळत आहे म्हणून किंवा त्या शेअर ची किंमत जास्त वाढत आहे. म्हणून लगेच त्या शेअर मध्ये कधीच गुंतवणूक करू नका.

जर तुम्ही दीर्घकालीन (Long Term) गुंतवणूक करणार असाल, तर त्या अगोदर तुम्ही ज्या कंपनीचा शेअर खरेदी करणार असाल किंवा गुंतवणूक करणार असाल. त्या कंपनीचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून व इतर माहिती समजून घेणे गरजेचे आहे.

जसे की, ती कंपनी कोणत्या प्रकारचे प्रॉडक्ट्स तयार करते, कंपनीचे प्रोडक्शन कसे आहे, कस्टमर सर्व्हिस व रिव्ह्यू कसा आहे हे सर्व जाणून घेणे गरजेचे आहे. तसेच त्या कंपनीच्या प्रॉडक्ट्स ना बाजारात किती मागणी आहे. व ते भविष्यात जास्त विक्री करू शकतील का हे सर्व माहीत करून घेतले पाहिजे.

5. मार्केट विषयी संपूर्ण अभ्यास करून नंतर गुंतवणूक करा.

Learn share market and invest in stocks

शेअर मार्केट हे भारतात तुम्हाला सर्वात जास्त व कमी वेळेत पैसे कमवून देण्याचे ठिकाण आहे. शेअर मार्केट ला सर्व जुगार असे म्हणतात. जुगार म्हणजे पैसा, नुकसान, टेन्शन. हो, जर तुम्ही पुरेपूर माहिती न गोळा करता कोणत्याही शेअर मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला सुद्धा ह्या सर्व बाबींना सामोरे जावे लागेल.त्यामुळे कोणत्याही शेअर मध्ये गुंतवणूक करायच्या आधी त्या शेअरचा पूर्णपणे अभ्यास करून घ्यावा. शेअर मार्केट मधील तांत्रिक आणि मूलभूत बाबींचा अभ्यास करून त्यात गुंतवणूक करावी. त्यामुळे प्रॉफिट होण्याचे जास्त मार्ग निघतील.

6. भावना कंट्रोल मध्ये ठेवणे.

share market for beginners in marathi

मानवी जीवनात भावना खूप महत्वाच्या असतात. आपण नेहमी भावनिक होतो. त्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो. तसेच शेअर बाजारात काम करत असताना, आपल्याला आपल्या भावना कंट्रोल करणे आवश्यक आहे. त्यासोबत आपल्याजवळ संयम आणि स्वतःवर विश्वास असला पाहिजे. शेअर्स खरेदी केल्यानंतर मार्केट कधी कधी खाली पडते. तेव्हा आपण भावनिक होतो. आणि शेअर बाझार सोडून जातो. पण अश्या वेळी आपण आपले डोके व मन शांत ठेवणे गरजेचे आहे.

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करताना घाबरु नये. तसेच जास्त भावनिक होऊ नये. घाबरून जाऊ नये तसेच अधिक लालची देखील होऊ नये. शांतपणे निर्णय घेतल्याने आपल्याला प्रॉफिट सुद्धा जास्त होतो. शेअर बाजारात प्रॉफिट मिळाल्याने आपला विश्वास वाढतो. व आपण आजुन जास्त जोमाने काम करू शकतो.

7. पोर्टफोलिओ वेगवेगळ्या शेअर्स चा असावा.

Portfolio tips in Marathi

शेअर्स खरेदी करताना वेगवेगळ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करणे गरजेचे आहे. जसे की, कन्स्ट्रक्शन, बँकिंग सेक्टर, ऑटोमोबाइल्स, आयटी सेक्टर, मशीन सेक्टर इत्यादी. प्रत्येक क्षेत्रातील काही टक्के शेअर्स खरेदी केले पाहिजे. ज्यामुळे आपला पोर्टफोलिओ विभिन्न सेक्टर्स मधील शेअर्स चा बनतो.

ह्याचा फायदा असा होतो की, आपल्याला कधी एका फील्ड मध्ये लॉस झाला तरी दुसऱ्या फील्ड मधून आपल्याला प्रॉफिट होऊ शकतो. तुम्ही एका वहीवर तुम्हाला कोणत्या सेक्टर्स मध्ये किती टक्के गुंतवणूक करायची आहे. ते लिहून घ्या व त्यानुसार गुंतवणूक करा.

8. शेअर मार्केट मधील टॉप 10 Holders बद्दल माहिती जाणून घेणे व त्यांना फॉलो करा.

Top 10 Share market holders list in Marathi

शेअर बाजाराची माहिती घेताना, आपण शेअर बाजारात कोण कोणते टॉप 10 गुंतवणूकदार आहेत. त्यांच्याबद्दल सुद्धा माहिती जाणून घेतली पाहिजे. ते कोणते शेअर्स खरेदी करतात, कश्या प्रकारे ते गुंतवणूक करतात. ह्याबद्दल जाणून घेतले पाहिजे. तसेच ते कोणत्या क्षेत्रातील शेअर्स खरेदी करतात.

ते सुद्धा आपण माहिती करून घेतले पाहिजे. तसेच ते कधी कोणते शेअर्स Sold करतात. ते सुद्धा आपण माहिती करून घ्यावे. ज्याचा आपल्याला शेअर्स खरेदी करताना खूप फायदा होईल. खाली आपण भारतातील Top Investors ची नावे जाणून घेऊया.

Sr Noभारतातील Top Investors
1Rakesh Jhunjhunwala and
Associates
2Premji And Associates
3Radhakishan Damani
4Mukul Agrawal
5Mukul Mahavir Prasad Agrawal
6Ashish Kacholia
7Ashish Dhawan
8Anil Kumar Goel And Associates
9Bhavook Tripathi
10Dilip kumar Lakhi

9. नेहमी दिर्घकालीन गुंतवणूक करण्याकडे लक्ष द्या.

long term investment tips in marathi
long term investment tips in marathi

लाँग टर्म इनवेस्टमेन्ट म्हणजेच दीर्घकालीन गुंतवणूक करण्याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. कारण भारतातील, तसेच जगातील सर्व टॉप गुंतवणूकदार दीर्घकालीन गुंतवणूकिवर जास्त विश्वास ठेवतात. तसेच ज्यामुळे त्यांना खूप फायदा सुद्धा झाला आहे. शेअर बाजारात येणारे नवखे फक्त एकच ध्येय घेऊन येतात.

ते म्हणजे कमी वेळेत, जास्त पैसे कमावणे. त्यामुळे ते Intraday Trading वर जास्त पैसे लावतात. व त्यांना नुकसान होते. इंट्राडे ट्रेडिंग मधील १००% पैकी फक्त १ ते २ % लोक सफल होतात. पण जर जोखीम न घेता दिर्घकालीन गुंतवणूक केली तर ते फायद्याचे ठरते.

10. कोणतेही फ्री कोर्स शिकून लगेच गुंतवणूक करू नका.

share market easy tips for beginners in marathi

आजकाल बरेच तरुण शेअर मार्केट शिकण्यासाठी Paid कोर्स पेक्षा Free Course ना जास्त प्राधान्य देत आहेत. Free कोर्स मधून आपल्याला शेअर बाजाराची योग्य ती माहिती मिळेल का, ह्याची खात्री नसते. यूट्यूब अनेक चॅनल्स आहेत. ज्यांच्यावर फ्री मध्ये शेअर बाजाराची माहिती व टिप्स दिलेले असतात. ते शिकून घ्यावे पण त्यानंतर आपण पुन्हा एकदा अभ्यास करून शेअर बाजार व्यवस्थित समजून घ्यावे.

ह्या सर्व Share Market Tips in Marathi वापरून शेअर बाजारात नक्की यशस्वी व्हाल. तसेच शेअर मार्केट हे जोखीम आहे. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेऊन ह्यात उतराव. तसेच शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या तुमच्या मित्रांना व नातेवाईकांना हा लेख नक्की शेअर करा. अश्याच नवनवीन लेख आपल्या मराठी मध्ये वाचण्यासाठी Creator Marathi वेबसाईट शी जोडून रहा.

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

One thought on “Share Market Tips in Marathi | शेअर मार्केट मध्ये यशस्वी होण्यासाठी हे टिप्स वापरा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *