Marathi Ukhane For Bride | 100+ नवरीसाठी मराठी उखाणे | Marathi Bride Ukhane

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

100+ नवरीसाठी मराठी उखाणे | Marathi Ukhane For Bride | Marathi Bride Ukhane

आजच्या लेखात नवरीसाठी बेस्ट मराठी उखाणे (Marathi Ukhane For Bride) घेऊन आलो आहोत. आम्हाला आशा आहे की तुम्हाला हे Marathi Ukhane For Bride नक्की आवडतील. तसेच तुम्ही हे Marathi Bride Ukhane सोशल मीडिया वर देखील शेअर करा.

नाव घे… लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर महाराष्ट्रीयन स्त्रियांमध्ये मजेशीर परंपरा आहे ती म्हणजे उखाणे घेण्याची. नाव घे म्हणून प्रत्येकीला लग्नानंतर तर सातत्याने आग्रह केला जातो. लग्न ठरल्यावर तर होणाऱ्या नववधूला पहिला सल्ला दिला जातो तो उखाणे पाठ करण्याचा. मग शोध सुरू होतो तो उखाण्यांचा आणि उखाणे पाठ करण्याचा. उखाण्यांची महाराष्ट्रातील परंपरा किती जुनी आहे, याबाबत जरी माहिती नसली तरी आजही उखाणे घेण्याची मजेशीर परंपरा सुरूच आहे.

नवरीसाठी मराठी उखाणे 
(Marathi Ukhane for bride)

कपाळाचं कुंकु, जसा चांदण्यांचा ठसा, ____ रावांचे नांव घेते, सारे जण बसा.

रातराणीचा सुगंध, त्यात मंद वारा,
____रावांचे नांवाचा, भरला हिरवा चुडा.

नवरिचे मराठी लेटेस्ट उखाणे
नवरिचे मराठी लेटेस्ट उखाणे

पौर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल,
….रावांच्या जीवनात टाकते मी पाहिले पाऊल.

खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध,
__रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद.

पंच पक्वांनाच्या ताटात, वाढले लाडू पेडे,
__रावांचे नांव घेतांना, कशाला आढे वेढे.

bride ukhane for marathi
bride ukhane for Marathi

दारी होती तुळस, तिला घालते होते पाणी
आधी होते आई बाबांची तान्ही,
आता झाले __ची राणी.

रुपेरी सागरावर चंदेरी लाट,
__ रावांचं नाव घेते सोडा माझी वाट.

सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात,
__रावांचे नांव घेते, __च्या घरात.

अंगणात वृंदावन, वृंदावनात तुळस,
__रावांच नांव घेतांना, कसला आला आळस.

गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,
__ रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी.

यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब
__चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब.

  • पतीव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते,
    __रावांचे नांव घेतांना, आशीर्वाद मागते.
  • लग्नात लागतात हार आणि तुरे,
    … च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.
  • कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून,
    …. चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून.
  • पुरूष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता,
    …. रावाचं नाव घेते तुम्हां सर्वांकरिता.
  • बारीक मणी घरभर पसरले,
    …. साठी माहेर विसरले.
  • वर्षाऋृतूत वरूणराजाने केली बरसात,
    ….. चे नाव घेण्यास केली मी सुरूवात.
  • रूक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन,
    … च्या साथीने आदर्श संसार करीन.
  • चंदनी पानात मुग्ध कळी हसली,
    … रावांच्या प्रेमात मी नकळत फसली.

हळदीकुंकवासाठी खास उखाणे (Ukhane In Marathi for Haldi Kunku)

सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी, __चे नाव घेते, हळदी-कुकुंवाच्या वेळी.

“जात होते फुलांला,पदर अडकला वेलीला, एवढे महत्त्व कशाला __च्या नावाला.”

  • लग्नानंतर बदलून चालत नाही नुसतं नाव, बदलावा लागतो स्वभाव,__ च्या घरी मिळेल, माझ्या कलागुणांना वाव. 😜
  • “नीलवर्ण आकाशात चंद्रासवे रोहिणी
    __च्या जीवनात__ही गृहिणी.
  • अथांग वाहे सागर संथ
    चालते होडी, परमेश्वर सुखी ठेवो
    __नी माझी जोडी.
  • हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे, __मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे.”
  • “इंग्रजीत म्हणतात मून,
    __चंं नाव घेते__ची सून.
  • आवडतं सर्वांना पुढचं पाऊल,
    __चं नाव घेते कुंकू लावून.
  • चांदीच्या ताटात गाजराचा हलवा,
    ….. रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा.
  • ”चांदीचे जोडवे पतीची खूण,
    …. रावांचे नाव घेते …. ची सून.“
  • दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या
    गाठी,__चे नाव घेते तुमच्यासाठी.!”
Girls marathi Ukhane romantic
Girls marathi Ukhane romantic
  • “नांदा सौख्यभरे दिला सर्वांनी आशीर्वाद,__ रावांचे नाव घेते द्या सत्यनारायणाचा प्रसाद!”
  • “लावीत होते कुंकु, त्यात पडला मोती,
    __ रावांसारखे मिळाले पती, भाग्य मानू किती.”
  • “पार्वती ने पन केला महादेवालाच वरीन, __ रावांच्या साथीनं, आदर्श संसार करीन.

लग्नविधीसाठी घेतले जाणारे मराठी उखाणे (Marathi Ukhane for Marriage)

  • पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते,
    __ रावांचे नाव घेऊन आशिर्वाद मागते.
  • गळ्यात मंगळसूत्र,मंगळसूत्रात डोरलं,
    __ रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.
  • घातली मी वरमाला हसले__ राव गाली,
    थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली.
  • वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल,
    __ रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.
  • मोह नसावा पैश्याचा, गर्व नसावा रूपाचा,
    __बरोबरसंसार करीन सुखाचा.
  • चांदीच्या वाटीत साखरेचे खडे,
    …चं.नाव घेते देवापुढे.
  • गावठी गुलाबाला सुगंध सुवास,
    __ रावांना भरवते श्रीखंडपुरीचा घास.
  • हळद असते पिवळी, कुंकू असते
    लाल,__ रावांची मिळाली
    साथ झाले जीवन खूशहाल.
  • मंगळसुत्राच्या दोन वाट्या सासर आणी माहेर, __ यांनी केला मला सौभाग्याचा आहेर.
  • सासरी आले तरी माहेरचे विसरता येत नाही अंगण, __ रावांचे नाव घेते सोडते मी कंकण.
  • नाव घ्या नाव घ्या म्हणता, नाव तरी काय घ्यायचे, __रावांना शेवटी अहोच म्हणायचे.
navrisathi ukhane in marathi
navrisathi ukhane in marathi
  • “ गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी,
    …. रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी.”
Marathi ukhane text
Marathi ukhane text
  • संसाररुपी पुस्तकाचे उघडले पाहिजे पान, ….रावांचे नाव घेते सर्वांचा राखून मान.

हे वाचायला विसरू नका:


उखाणे म्हणजे काय?

आता जरी बायका आपल्या नवऱ्याला सर्रास त्याच्या नावाने हाक मारत असल्या तरी पूर्वीच्या काळी मात्र अशी पद्धत नव्हती. मग नवऱ्याचं नाव घ्यायचं कसं. त्यातूनच उखाण्यातून नाव घेण्याची पद्धत सुरू झाली. उखाणे म्हणजे लहान आणि यमक जुळवून केलेल्या वाक्य-रचनेतून आपल्या पतीचे नाव घेणे. खासकरून महाराष्ट्रीयन लग्नात नवरा आणि नववधूंना उखाण्याचा आग्रह केला जातो. आजकाल उखाण्यात बरीच विविधता दिसून येते.  उखाण्यासोबतच विनोदी उखाणे खूपच लोकप्रिय आहेत. पाहूया उखाणे आणि त्यातील विविध प्रकार.


नवरी साठी गृहप्रवेश उखाणे [GruhPravesh Ukhane For Bride]

  • “जमले आहेत सगळे, __ च्या दारात
    __ रावांचे नाव घेते, येऊ द्या ना घरात.”
  • “रुपेरी सागरावर चंदेरी लाट,
    _रावानच नाव घेते सोडा माझी वाट.”
  • “लग्न झाले आता,आमची बहरू दे संसारवेल__
    च नाव घेते, वाजवून __च्या घराची बेल.”
  • “माहेरी साठवले, मायेचे मोती__
    च नाव घेऊन, जोडते नवी नाती.”
  • __ची लेक झाली, __ ची सून.
    . __च नाव घेते, गृहप्रवेश करून !
  • “हंसराज पंक्षी दिसतात हौशी,
    __रावाचे नाव घेते सत्यनारायनाच्या दिवशी.”
  • “गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट
    __ नाव घेते सोडा माझी वाट.”
  • “आकाशाच्या प्रांगणात ब्रम्हा विष्णू आणि महेश, __रावांच नाव घेते आणि करते मी गृहप्रवेश.”
marathi special ukhane
marathi special ukhane
  • शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी,
    आता__ राव माझे जीवनसाथी.
  • “वय झाले लग्नाचे, लागली प्रेमाची चाहूल, __ रावांच्या जीवनात टाकले मी पाऊल.”
  • “सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात,
    __ रावांचे नांव घेते,__च्या घरात.”
  • “फुल फुलावे रानोरानी स्वप्न गहिरे दिसावे
    __रावांच्या सुखात माझे सुख असावे.”
Bride ukhane in marathi
Bride ukhane in marathi
  • जेव्हा मी ह्यांना पाहते चोरुन,
    विचार करते मुक होऊन, घडविले
    देवांनी __ रावांना जीव लावून.
  • “सासरे आहेत प्रेमळ, सासुबाई आहेत हौशी,
    __ चे नाव घेते प्रवेश करण्याच्या दिवशी.”
  • “लग्न झाले आता,आमची बहरू दे संसारवेल__च
    घेते, वाजवून __च्या घराची बेल.

रोमँटिक मराठी उखाणे

Bhari ukhane in marathi
Bride ukhane in marathi

लग्नाला अनेक वर्ष झाल्यावरही एकमेकांप्रती असलेलं प्रेम जाहीर करण्यासाठी अनेकदा उखाणे घेतले जातात. आजच्या काळात एकमेकांना वेळ देणे जास्त जमत नाही. परंतु उखाणे घेऊन एकमेकांना खुश करू शकतो. त्यासाठीच हे खास उखाणे आणले आहेत. असेच काही रोमँटिक उखाणे खास तुमच्यासाठी. तुम्हाला हे उखाणे नक्की आवडतील.

  • “ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल,
    __चे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल.”
  • पतीव्रतेचा धर्म नम्रतेने वागते,
    …. रावांचे नाव घेऊन आशीर्वाद मागते.
  • “सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, __ चे नाव घेते
    __च्या घरात.”
  • मंगळ सुत्रातील दोन वाट्या एक संसार
    आणि दुसरे माहेर,…. रावांनी दिला मला
    सौभाग्याचा आहेर.
  • “लग्नाचा वाढदिवस करू साजरा,
    __ तुला आणला चॉकलेट डब्बा”.
  • हळद असते पिवळी, कुंकु असते लाल
    __ रावांची मिळाली साथ झाले जीवन खुशहाल.
  • “चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण,
    __चे नाव घेऊन सोडते कंकण.”
  • “आंबागोड, उस गोड,
    त्याही पेक्षा अमृत गोड, __ चंनाव आहे
    चॉकलेट पेक्षा ही गोड.”
  • “नाव घ्या..नाव घ्या म्हणता..,
    नाव तरी काय घ्यायचे,
    …. रावांना शेवटी अहोच म्हणायचे.
  • चांदीच्या ताटात जिलबीचे तुकडे,
    घास भरवतो मरतुकड्या तोंड कर इकडे
  • गुलाबाचे फूल वाऱ्यावर लागते डोलू,
    दिवसभर सुरू असते__ चे गुलूगुलू.
  • गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरल,
    __ रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.
  • 5 + 4 इज इक्वल टू नाईन, …इज माईन.”

तुम्हाला जर हे उखाणे आवडले असतील, तर आम्हाला कॉमेंट्स करून नक्की सांगा. व आम्हाला सोशल मीडिया वर देखील फॉलो करा. तुम्हाला आजच्या लेखातील  Marathi Ukhane For Bride | Marathi ukhane for marriage / satyanarayan poojesaathi ukhaane / Gurhpravesh ukhaane navrisaathi / मराठी सत्यनारायण पूजा उखाणे नवरी साठी/ गृहप्रवेश उखाणे नवरी साठी /रोमॅंटिक उखाणे नवरी साठी आवडले असतील तर सोशल मीडिया वर नक्की शेअर करा. तसेच तुमच्याजवळ जर उखाणे असतील तर आम्हाला नक्की पाठवा, आम्ही ते ह्या लेखात नक्की अपडेट करू..

Thank You For Reading This Article & Keep Supporting.! ❣️
माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *